Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

विमानसेवा सुरळीत होण्यासाठी उद्योजक मैदानात; आयमा एव्हिएशन कमिटीची स्थापना

Share

सातपूर । प्रतिनिधी

नाशिकच्या औद्योगिक व व्यापारी संघटनांनी नाशिकच्या विमानसेवा प्रश्नाची तड लावून यात सातत्य ठेवण्यासाठी आयमा एव्हिएशन कमिटीची स्थापना करुन पून्हा एकदा उद्योगांसाठी आवश्यक असणार्‍या सुविधेसाठी लढा उभारण्ंयांसाठी सज्ज झाले असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

आयमा एव्हिएशन कमिटीत आयमा, निमा, महाराष्ट्र चेम्बर, निटा, नाशिक सिटीझन फोरम व इतर संघटनांच्या माध्यमातून आयमा एव्हिएशन कमिटीची स्थापना करण्यात आली. आयमाच्या के आर बूब सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आयमा अध्यक्ष वरूण तलवार, नाशिक सिटीझन फोरमचे आशिष कटारिया, ‘निटा’चे अध्यक्ष अरविंद महापात्रा, निमाचे प्रतिनिधी मनीष रावल उपस्थित होते.

नाशिकचा विकासाला गती देण्यासाठी विमानसेवेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नाशिकहून नऊ ठिकाणांसाठी सेवा सुरु केली जाणार होती. पण केवळ दोनच शहरांसाठी सुरु झालीे. इंडिगो कंपनीने सप्टेंबरपासून दिल्लीकरिता विमानसेवा देण्याचे स्पष्ट केले होते. याकरिता नाशिक विमानतळावर कर्मचारी नियुक्त केले होते. मात्र विमान उपलब्ध नसल्याचे कारण देत ही सेवा पुढे ढकलली. लगेचच शिर्डीसाठी विमान उपलब्ध झाल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

उडान सेवेअंतर्गत हा विकास होणार होता तो विकास का झाला नाही याचाही खुलासा शासनाद्वारे झाला पाहिजे. कारण प्रत्येक योजनेत दिली जाणारी सवलत ही कराच्या वसूलीतूनच दिली जात असल्याचे प्रतिपादन आयमा अध्यक्ष वरूण तलवार यांनी केले. नाशिक सिटीझन फोरमचे आशिष कटारिया यांनीही नाशिकच्या विकासासाठी विमानसेवा अत्यावश्यक असल्याचे सागून तत्पर विमानसेवा नसेल तर विकासाला गती मिळणार नसल्याचेे सांगितले.

निमाचे मनीष रावल यांनी उडान सेवेअंतर्गत आम आदमी विमानसेवेद्वारा उद्योग, व्यवसायासाठी जोडले जाणार होते पण तसे झाले नाही. नाशिकचा आयटी विकास साधायचा असेल तर विमानसेवा फार महत्त्वाची आहे. विमानसेवा सुरळीत नसल्यामुळे नाशिक आयटी क्षेत्राचा विकास होऊ शकलेला नाही याची खंत ‘नीट’चे अध्यक्ष अरविंद महापात्रा यांनी व्यक्त केली. यावेळीं आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ, राजेंद्र पानसरे, योगिता आहेर, उन्मेष कुलकर्णी, नीलिमा पाटील, विजय जोशी, गोविंद झा आदींसह उद्योजक उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!