Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक-पेठ रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Share

करंजाळी । वार्ताहर

नाशिक-पेठ-धरमपूर या महामार्गाची अतिशय दयनिय अवस्था झाल्याने हा रस्ता पुर्णत: मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांनी व नागरिकांनी केली आहे.

नाशिक -धरमपूर हा गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम मागील तीन वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. हा रस्ता गुजरात व महाराष्ट्र राज्याला जोडतो. त्यामुळे अवजड वाहतूक, नेहमी ये-जा करणारे नियमित प्रवाशी, स्थानिक नागरीक यांची रहदारी असते. मात्र आंबेगण ते करंजाळी या मार्गाचे काम रखडले आहे.जोरदार पावसाने हा रस्ता संपूर्ण उखडून गेला आहे. खडड्यात साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीधारकांना खडड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीधारक पडतात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. काही ठिकाणी पुलावरचे गजांचे सांगाडे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वाहन पंच्चर होणे, पलटी होणे, बिघाड होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सावळघाट रस्त्याची चाळण झाली आहे. परिणामी मोठा अपघात होऊन जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे हे खड्डे त्वरित बुजवावेत व रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांनी व नागरिकांनी केली आहे.

नाशिक-पेठ-धरमपूर या रस्त्याचे काम गेल्या सहा ते सात महिैन्यापुर्वीच झाले होते.मात्र सहा महिन्यातच रस्ता पुर्णत: उखडून गेला आहे. जर संबंधित अधिकार्‍यांनी या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे केले असते तर या रस्त्याची दुरावस्था झाली नसती. या महामार्गावरील आंबेगण ते करंजाळी रस्त्याचे अपूर्णच सोडण्यात आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
विद्याधर गवळी सामाजिक कार्यकर्ते, करंजाळी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!