Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

कंत्राटी शिपाई भरती; शासन निर्णयाची होळी

Share

नाशिक । प्रतिनिधी

शासनाकडून महसूल व वनविभागात कंत्राटी शिपाई भरतीचा निर्णय घेण्यात आला असून या आदेशाचा नाशिक जिल्हा चतुर्थश्रेणी महसूल कर्मचारी संघटनेकडून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध करून होळी करण्यात आली. या निर्णयाच्या निषेधार्थ अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना निवेदन देण्यात आले.

शासनाने चतुर्थश्रेणी सेवक कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतलां असून त्यामुळे संघटनेमध्ये तीव्र संताप आहे. हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार वर्ग-४ श्रेणी सेवकांच्या पदोन्नतीचा कोटा २५ हून ५०टक्के इतका करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून कोणत्याही प्रकारची पदोन्नती देण्यात आलेली नाही.

वर्ग-४ ची २५ टक्के पदे निरसीत करण्याचा प्रत्येक विभागात सपाटा लावण्यात आला आहे. सदर पदे निरसीत करणे त्वरित थांबवावे, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. तसेच कोतवाल सेवक यांना चतुर्थश्रेणीमध्ये पदोन्नतीचा कोटा राज्यात कोतवाल यांना शिपाई संवर्गात पदोन्नती देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर अनुकंपा भरतीचा २० टक्के शासन निर्णय असताना गेल्या तीन वर्षांत अनुकंपा भरती करण्यात आलेली नाही. त्या निषेधार्थ नाशिक जिल्हा चतुर्थश्रेणी महसूल कर्मचारी संघटनेकडून दुपारी जेवणाच्या सुटीत आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कासार, सरचिटणीस अरुण तांबे, कार्याध्यक्ष किसन सानप, खजिनदार शांताराम वाकसरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!