नाशिक शहरात सात दिवसात १०० नवीन रुग्ण; २१४ करोना बाधीत

नाशिक शहरात सात दिवसात १०० नवीन रुग्ण; २१४ करोना बाधीत

 आठवडाभरात ७५० संशयित रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोना रुग्णांचा आकडा वेगात वाढत असुन रविवारी(दि.३१) शहरातील रुग्णांचा आकडा २१४ पर्यत गेला आहे. तसेच मृतांचा आकडा ९ झाला आहे. एकीकडे बाधींचा आकडा वाढत असतांनाच त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची संशयित म्हणुन भर पडत आहे. करोना संशयित रुग्णांचा आकडा वाढत असुन २५ ते ३१ मे या सात दिवसात ७५१ संशयितांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करोना बाधीत क्षेत्रातून शहरात दाखल होणार्‍या व्यक्तींचा आकडा तीन हजाराच्या जवळ येऊन ठेपला असुन यातून नवीन बाधीत रुग्ण समोर येऊ लागले आहे.

रविवारी दिवसभरात शहरात ३६ करोना रुग्ण आढळून आल्याने एकुण रुग्णाचा आकडा २१ इतका झाला होता. तसेच २९ मे रोजी मृत झालेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे आता मृताचा आकडा ९ झाला आहे. यानंतर रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आलेल्या अहवालात शहरातील ६ जणांना करोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता नवीन ९ रुग्ण आढळून आले होते.

यात गंजमाळ पंचशिलनगर येथील ३५ वर्षी महिला, ड्रीम व्हॅली शिंगाडा तलाव येथील ४६ वर्षीय पुरुष, मालेगांव जिल्हा रुग्णालयातील ३२ वर्षीय आरोग्य सेवक, ओम गुरुदेवनगर मखमलाबाद रोड येथील २१ व २३ वर्षीय युवक व ४६ वर्षीय महिला, लेखानगर येथील रुग्णांच्या संपर्कातील ३२ व ३५ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला यांचा समावेश होता.

त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता २१ बाधीत रुग्णांचा अहवाल आला होता. यात वडाळागांव रुग्णांच्या संपर्कातील ५० वर्षीय पुरुष, ६०, ३८, ४७, ४० वर्षीय महिला,१८, २२ वर्षीय महिला व १२ व ९ वर्षीय बालिका, मुंबईहून प्रवास करुन आलेले पाथर्डी फाटा दोंदे मळा येथील ४८ वर्षीय पुरुष व ३८ वर्षीय महिला, स्नेहनगर म्हसरुळ येथील ६५ वर्षीय पुरुषाचा २९ मे रोजी मृत्यु झाल्यानंतर याचा अहवाल पॉझिटीव्ह आला, कलानगर दिंडोरीरोड येथील रुग्णांच्या संपर्कातील ६७ वर्षीय पुरुष, विनयनगर येथील ३२ वर्षीय महिला व १३ वर्षीय मुलगी, काळे चौक वडाळागांव येथील ५६ वर्षीय महिला, झीनतनगर वडाळागांव ६२ वर्षीय पुरुष, अशोका मार्ग येथील ३९ वर्षीय पुरुष व गोसावीवाडी नाशिकरोड येथील ५४ वर्षीय पुरुष अशा रुग्णांचा समावेश आहे. अशा प्रकारे महापालिका क्षेत्रातील बाधीतांचा आकडा २१४ झाला आहे.

दरम्यान शहरात आजपर्यत करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या २९६५ झाली असुन यातील ९४५ जणांचा देखरेखीखालील १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात २९६५ संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर २७५४ जणांना घरी सोडण्यात आले. दरम्यान ६ एप्रिल ते ३१ मे २०२० या कालावधीत शहरात २१४ रुग्ण आढळून आले असुन रुग्ण राहत असलेल्या घराजवळील परिसर असे एकुण ८१ भाग आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केले होते. यातील २९ प्रतिबंधीत क्षेत्रात नव्याने करोना रुग्ण आढळून न आल्याने याठिकाणचे निर्बंध पुर्णपणे हटविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com