Thursday, April 25, 2024
Homeनाशिक१ लाख ६५ हजार मतदारांची पडताळणी बाकी

१ लाख ६५ हजार मतदारांची पडताळणी बाकी

२९ फ्रेबुवारी पर्यंत मुदत  : ९६ टक्के काम पूर्ण

नाशिक ।प्रतिनिधी

- Advertisement -

राष्ट्रीय मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ४२ लाख ९७ हजार ६६७ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. पडताळणी कार्यक्रमाला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नऊ दिवसात १ लाख ६५ हजार मतदारांची पडताळणी पूर्ण करण्याचे आव्हान निवडणूक शाखेपुढे आहे.

देशभरात राष्ट्रीय मतदार पडताळणी कार्यक्रम सुरु आहे. बूथ लेवल ऑफिसरकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. त्यात मतदारांचे मोबाईल नंबर नोंंदविणे, जात आधार कार्डही जोडले जात आहे. त्यामुळे होतं अस की खरंच संबधित मतदार त्या मतदारसंघातील असेल तरच त्याचे नाव यादीत कामय ठेवले जाईल, अन्यथा ते काढून टाकले जाण्याची दाट शक्यता आहे.

मयत, दुबार नावांचे, स्थलांतरीत झालेले, १८ वर्ष पुर्ण होणारे नव मतदार अशांचीच नावे यात कायम राहतील, इतर बोगस नावे आपोआप कमी होतील. त्यानुसार जिल्ह्यात कामही गतिमान झाले आहे. पण एकूण मतदारांपैकी ९६ टक्के म्हणजे ४३ लाखावर मतदारांची प्रत्यक्षात पडताळणी झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात येत आहे, प्रत्यक्षात मोबाईल नंबरचे ऑथेंटीकेशन अवघे १३ हजार मतदारांचेच झाले आहे. त्यामुळे बुथ लेव्हल ऑफिसर बीएलओ यांनी खरंच आयोगाला अपेक्षित असलेल्या पध्दतीनुसारच मतदारांची पडताळणी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्य स्थितीत बहुतांशी प्रत्येक मतदाराकडे मोबाईल नंबर आहे. कमीत कमी एक कुटूंबात तरी मोबाईल आहे. असे असताना ही संख्या अत्यल्पच असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पुढील नऊ दिवसात जवळपास दीड लाख मतदारांची पडताळणी करण्याचे आव्हान निवडणूक शाखेपुढे आहे.

े.

- Advertisment -

ताज्या बातम्या