Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव शहरात मोटारसायकलींची चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात

Share

नांदगाव।प्रतिनिधी

नांदगाव शहरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती.१९ मोटारसायकली चोरीला गेल्या होत्या. सदर मोटारसायकली ठराविक दिवशी व ठिकाणाहून जात असल्याचा निष्कर्षतून दिसून आले. या दृष्टिकोनातून पोलिसांनी सापळा रचून आरोपींंच्या मुसक्या आवळल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे यांनी दिली.

नांदगाव शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे.शहरातून १९ मोटार सायकल चोरीला गेल्याची तक्रारी केल्या आहेत. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीसांनी शहरातील गुरुवारी सकाळ पासूनच मच्छीबाजार, खुशबू हॉटेल व पांचाळ गल्ली आदी ठिकाणी साध्या गणवेशात पोलीस तैनात करण्यात आले होते.वरील ठिकाणी सदर व्यक्ती सायंकाळी सहा वाजता चार/पाच मोटार सायकलींना चाव्या लावण्याच्या प्रयत्न करत संशयास्पद हालचाली करतांना आढळून आला.

सकाळी पासून लावून ठेवलेल्या एका मोटारसायकला बनावट चावी लावून चालू करून जात असताना पो.ना.भारत कांदळकर व पोलीस मित्रांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्यांने त्याचे नाव प्रविण रतन सोनवणे(२४)रा.राजमाने ता.मालेगांव तथा हल्ली मुक्काम रा.मेहुणबारे ता.चाळीसगाव असे सांगितले.

नांदगाव पोलिसांनी खाकी दाखविल्याने वरील ठिकाणीहुन १४ मोटार सायकल चोरून नेल्याची कबुली दिली आहे. सदर संशयित आरोपीकडून १४ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे यांनी दिली.पोलिसांत भादवी ३७९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक संदिप घुगे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पो.ह.श्रावण बोगीर, राकेश चौधरी, अनिल शेरेकर,प्रविण गांगुर्डे, सतिष मोरे,सदिप बत्तासे, आदींनी परिश्रम घेतले.

दरम्यान, या चोरांकडून आणखी मोटार सायकली मिळण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!