Friday, April 26, 2024
Homeनाशिकमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नाशिक जिल्ह्यात शंभर टक्के मतदान

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नाशिक जिल्ह्यात शंभर टक्के मतदान

नाशिक ।  प्रतिनिधी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नाशिक विभागातून निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठी नाशिक जिल्ह्यात शंभर टक्के मतदान झाले.विभागातून दोन जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मतदान केंद्रात शनिवारी (दि.२९) जिल्ह्यातील २३८ मतदारांनी आपला हक्क बजावला. सोमवारी (दि.२) वाशी बाजार समितीमध्ये मतमोजणी होणार आहे.

- Advertisement -

नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर व नाशिक येथे मतदान केंद्र होते. नाशिकच्या मतदान केंद्रावर उमेदवारांनी बुथ उभारले होते. मतदारांना अभिवादन करत त्यांना मतदान करण्याची विनंती उमेदवारांकडून करण्यात येत होती. माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे यांच्यासह अनेक नेत्यांनी दिवसभर केंद्रावर हजेरी लावत मतदारांना आवाहन केले. दुपारी २ वाजेपर्यंत ६० टक्के मतदानाची नोंद झाली होती.

यावेळी मतदान करण्यापूर्वी काही मतदारांनी आढेवेढेही घेतले. उमेदवारांनी त्यांची समजूत काढल्यानंतर मतदानाची टक्केवारी झपाट्याने वाढली. अखेर मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असली तरी दुपारी ४ वाजेपर्यंतच सर्व मतदारांनी आपला हक्क बजावल्याचे दिसून आले.

नाशिक विभागातून आठ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे, जळगाव येथील प्रभाकर पवार, सुनील पवार, किशोर पाटील हे उमेदवार आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील हर्ष शेवाळे, नंदुरबारचे किशोर पाटील तर, धुळ्यातून रितेश पाटील यांनी निवडणुकीत चुरस आणली आहे. महाविकास आघाडीतर्फे नाशिकचे जयदत्त होळकर व धुळ्याचे रितेश पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या