Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एटीएम फोडणार्‍या टोळीवर मोक्का; थरारक पाठलाग करून टोळी केली होती जेरबंद

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील सातपूर परिसरात एटीएम फोडून पळवण्याचा प्रयत्न करणार्‍या धुळ्याच्या भादा गँगवर नाशिक पोलीसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का)कारवाई केली आहे. २४ सप्टेंबरला पहाटे शहरात नाशिक पोलीसांनी त्यांचा थरार पाठलाग करून संशयितांना गजाआड केले होते.

गजानन मोतीराम कोळी (२३), मिलनसिंग रामसिंग भादा (३४, रा. मोहाडी, धुळे), किस्मतसिंग रामसिंग भादा (२०), तलवारसिंग जन्नतसिंग भादा (२०), रामसिंग राजुसिंग जुन्नी (२५), आझादसिंग कृपालसिंग भादा (४५) (रा. सर्व दंडेवाला बाबानगर, मोहाडी, ता. जि. धुळे) अशी मोक्का कायद्याने कारवाई केलेल्या सराईतांची नावे आहेत.

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बॅँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत रात्र गस्तीसाठीअ आलेल्या बिट मार्शल व शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना एटीएम लांबविता आली नाही. पोलीसांच्या अंगावर गाडी घालून त्यांनी पळ काढला होता. बीट मार्शलने नियंत्रण कक्षास कळवल्यानंतर रात्र गस्तच्या सर्व पोलिस पथकांनी दरोडेखोरांचा थरारक पाठलाग करून गजानन मोतीराम कोळी, मिलनसिंग रामसिंग भादा या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून त्याच रात्री ताब्यात घेतले होते.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.दरोड्यात निष्पन्न झाली. या सहा सराईत दरोडेखोरांनी मिळून पालघर, ठाणे, डहाणू जिल्ह्यांत घरफोडी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांच्या हाती लागलेला मिलनसिंगविरूध्द १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून गजाननविरूध्द ९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. हे गुन्हेगार सराईत असून संघटितपणे दरोडे, हाणामार्‍या, जबरी लूटसारखे गुन्हे करत असल्याचे तपासात पुढे आल्याने त्यांच्याविरूध्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मोक्का कारवाई केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!