Type to search

Featured नाशिक

‘देशदूत’ कर्मयोगिनी प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत सहा भाग्यवान विजेत्यांची निवड

Share

नाशिक | प्रतिनिधी

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणार्‍या ‘देशदूत’ कर्मयोगिनी पुरस्कारातील प्रश्‍नमंजुषेच्या शेवटच्या आठवड्याचे भाग्यवान विजेते होण्याचा मान रेखा वेदविख्यात, अनिल वाघ, जयश्री राजेंद्र संधान यांनी तर उपविजेते होण्याचा मान शुभम सोमवंशी, गोकूळ निकुंभ, वर्षा वाघ यांना मिळाला.

खडतर प्रवास करून विविध कार्यक्षेत्रात यशाचे नवे मानदंड प्रस्थापित करणार्‍या यशस्विनींची यशोगाथा ‘देशदूत’मध्ये प्रसिद्ध झाल्या . अशा यशस्विनींच्या मुलाखतीमधून वाचकांना एक प्रश्‍न विचारला गेला . दि. ८ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत कर्मयोगिनी पुरस्कार नामांकनप्राप्त कर्मयोगिनींच्या प्रसिद्ध झालेल्या यशोगाथांवर आधारित विचारल्या गेलेल्या प्रश्‍नांवर प्राप्त कूपनमधून मान्यवरांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला.

विजेत्यांना सोनी गिफ्टतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. वाचकांनाही या स्पर्धेत सहभागी होण्यासोबतच कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथेतून प्रेरणा घेत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धेतून ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!