Saturday, May 11, 2024
Homeनाशिककरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी इगतपुरी नगरपरिषदेच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

करोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी इगतपुरी नगरपरिषदेच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

घोटी । जाकीरशेख

आज इगतपुरी नगरपरिषदेत तहसीलदार अर्चना पागेरे, नपा मुख्याधिकारी निर्मला गायकवाड मॅडम, पि.आय. रत्नपारखी साहेब, संजयभाई इंदुलकर, प्रभारी नगराध्यक्ष नईमभाई खान, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवरे मॅडम व सन्माननीय नगरसेवक व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश श्रीश्रीमाळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

- Advertisement -

यात इगतपुरी शहर हे सध्या ऑरेंज झोन मध्ये आहे ते रेड किंवा कंटेंटमेंट झोन मध्ये जर गेले तर जे चालू आहे ते व्यापार-उद्योग संपूर्ण पणे बंद पडतील. व येत्या महिणा अखेरीस संपुर्ण भारतात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे असे अनेक संस्थाचे अहवाल आहेत. व इगतपुरी शहर हे नॅशनल हायवे वर असल्याने मुंबईहुन स्थलांतर करणाऱ्या हजारो परप्रांतीयांचे लोंढे हे आपल्या शहरा जवळुन जात आहेत. यामुळे पण आपल्या येथे मोठया प्रमाणात धोक्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता इगतपुरी शहरात पण अतिशय दक्षता घेणे गरजेचे आहे. अशी अनेकांची या बैठकीत सुचना होती.

त्यानुसार पुढील महत्वाचे निर्णय घेण्यात आले

१) सर्व प्रकारची दुकाने(हॉटेल वगळुन) उघडण्यास शहरात परवानगी आहे.
२) सर्व प्रकारच्या दुकानांची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहील.
३) आठवड्यातुन ३ दिवस मंगळवार, गुरुवार व रविवारी सर्व दुकाने बंद राहतील तर
सोमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार हे ४ दिवस सर्व प्रकारची दुकाने उघडी रहातील.
यात दवाखाना व मेडिकल वगळण्यात येतील
४) बाहेरगावच्या मालाच्या गाड्या खाली करण्याची वेळ दुपारी १ ते ५ ही राहील. त्या पण पूर्ण सॅनिटाईझ करणे बंधनकारक आहे.
५) इगतपुरी तालुका सोडुन बाहेरगावचे भाजीविक्रेते तसेच मालेगावच्या फळविक्रेत्यांना शहरात येऊन विक्री करण्यास पुर्णपणे बंदी आहे.
६) पीआय रत्नपारखी साहेब हे इगतपुरीच्या सगळ्या प्रवेशद्वारावर परत बॅरिकेटेड लाऊन गावातील सर्व सीमा सील करणार आहेत.
७) व्यापार करतांना मास्क लावणे, गिऱ्हाकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, व इतर सर्व शासनाचे निर्णय पाळणे बंधनकारक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या