Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्हा परिषदेतर्फे पाठयपुस्तकांचे वाटप सुरू

जिल्हा परिषदेतर्फे पाठयपुस्तकांचे वाटप सुरू

नाशिक । प्रतिनिधी

प्राथमिक शाळा उघडण्याबाबत अद्याप शासनाने कुठलीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नसून त्यादृष्टीने शासनाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेतर्फे समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठयपुस्तक वितरण योजनेंतर्गत अंबड येथील पाठ्यपुस्तक भांडारमधून पाठयपुस्तकांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ५,१५,६४८ विद्यार्थी करीता २७,८९,५७९ पाठ्यपुस्तके वितरीत करण्याकरीता पाठ्यपुस्तक भांडार,अंबड येथून दोन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे.१५ जून पर्यंत शंभर टक्के पाठ्यपुस्तके शाळास्तरापर्यंत पोहोच करण्यात येणार आहे.गटस्तरावरुन वाहतूकदार निश्चित करुन शाळास्तरावर पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांमध्ये आगामी टप्प्यात या पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमधून सुमारे ५ लाख १५ हजार ६४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक वर्षात सुमारे २७ लाख ८९ हजार ५७९ पुस्तकांची आवश्यकता आहे. छपाई झाल्यानंतर ही पाठ्यपुस्तके येत्या १५ जून पर्यंत शाळास्तरापर्यंत पोहोच करण्यात येणार आहे. यासाठी गट स्तरावरून वाहतूकदार निश्चित करुन शाळा स्तरावर पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. जिल्ह्यामध्ये दिंडोरी, निफाड, मालेगांव, सटाणा, मालेगांव आदी तालुक्यातून विद्यार्थी संख्या जास्त आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये या पुस्तकांचीही छपाई अडकली होती. आता आगामी पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही पुस्तके पोहचविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे.

नाशिक : १ लाख ५१ हजार २४९
सिन्नर : २ लाख २४ हजार ९२२
दिंडोरी : २ लाख ४७ हजार ८१६
इगतपुरी : १ लाख ७८ हजार ८९६
निफाड : २ लाख ४१ हजार ९८४
पेठ : १ लाख १२ हजार ८४०
चांदवड : १ लाख ६३ हजार ९५
नांदगांव : २ लाख १४ हजार ४३४
कळवण : १ लाख ५७ हजार ७२
सटाणा : २ लाख ८२ हजार ९४५
येवला : १ लाख ७४ हजार ३८८
मालेगांव : २ लाख २१ हजार ३५७
सुरगाणा : १ लाख ५६ हजार ७५७
देवळा : १ लाख ५७ हजार १०
त्र्यंबकेश्वर : १ लाख ५६ हजार ११४

- Advertisment -

ताज्या बातम्या