Type to search

लोकलच्या दारांंवर निळे दिवे

Featured maharashtra नाशिक

लोकलच्या दारांंवर निळे दिवे

Share
मुंबई | वृत्तसंस्था मुंबईतील उपनगरी गाड्यांमध्ये (लोकल) चढताना होणारे प्रवाशांचे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता उपनगरी गाड्यांच्या प्रत्येक दरवाजाच्या वरच्या भागावर निळ्या रंगाचा दिवा बसवण्यात आला आहे.
गाडी सुरू होत असताना निळा दिवा पेटेल. त्यामुळे गाडी सुरू होत असल्याचे प्रवाशांना समजेल. या नव्या उपायामुळे अपघात रोखणे शक्य होईल, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत आज एक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केला. या चित्रफितीत उपनगरी गाडी सुरु होताना निळा दिवा पेटताना दिसतो. दिवा तीन-चार वेळा चालू-बंद झाल्यावर गाडी फलाटावरुन मार्गस्थ होताना दिसत आहे.
‘सेफ्टी फर्स्ट. गाडीत चढणार्‍या प्रवाशांसाठी प्रत्येक डब्याच्या दरवाज्यावर निळ्या रंगाचा दिवा लावण्यात आला आहे. हा दिवा प्रवाशांना गाडी सुरू झाल्याचे सूचित करील. त्यामुळे शेवटच्या क्षणी गाडीत चढताना होणार्‍या दुर्घटना टाळता येतील, असे ट्विट गोयल यांनी केले आहे.
सध्या मुंबईत अनेक जण उपनगरी गाड्या धावत जाऊन पकडण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या क्षणी गाडी सुटेल ते माहित नसते. त्यामुळे अचानक अनेकदा भीषण दुर्घटनाही घडतात. निळ्या दिव्यामुळे आता मात्र गाडी सुरु झालेली लोकांना समजेल. एखादी गाडी सुटणार असल्याचे लोकांना दूरवरून दिसणार आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!