येवल्यात आजपासून प्रागतिक विचार व्याख्यानमाला

0

येवला । दि. 25  प्रतिनिधी

समता प्रतिष्ठान येवला तर्फे शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात प्रागतिक विचार व्याख्यानमालेस आज रविवार दि. 26 पासून सुरुवात होत असून या प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे उद्घाटन रविवारी सायंकाळी 5.30 वाजता देशदूतचे संचालक संपादक विश्वास देवकर यांच्या हस्ते होणार आहे. व्याख्यानमालेचे 20 वे वर्षे आहे.

या प्रागतिक विचार व्याख्यानमालेत  रविवार (दि. 26) रोजी जेष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे यांचे आम्ही भारतीय लोक या विषयावर तर सोमवार रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांचे वाचू-नाचू किर्तनाच्या रंगी, मंगळवार रोजी जेष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे माणूसपणाचं शिक्षण, बुधवारी जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांचे भारतीय संविधानापुढील आव्हाने, गुरुवारी डॉ. मंजुश्री पवार यांचे शिवकालीन स्त्रियांचे कर्तृत्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, अ‍ॅड. माणिकराव शिंदे, उषाताई शिंदे, गोल्डमॅन पंकज पारख, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, प्रांताधिकारी भिमराज दराडे, पोलीस उपअधिक्षक राहुल खाडे, तहसिलदार नरेशकुमार बहिरम, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, पोलिस निरीक्षक संजय पाटील, बाळासाहेब भापकर, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, उद्योगपती सुशिल गुजराथी, राजेश भांडगे, ज्ञानेश्वर खैरनार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन समता प्रतिष्ठानचे अर्जुन कोकाटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*