येवल्यात नवीन लाल कांदा भाव तेजीत

0

येवला । दि. 25 प्रतिनिधी
सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर नविन लाल कांद्याच्या आवकेस सुरुवात झाली असून बाजारभाव तेजीत असल्याचे दिसुन आले.

कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापुर इ. ठिकाणी मागणी चांगली होती.

सप्ताहात एकुण कांदा आवक 24 हजार 599 क्विंटल झाली असुन लाल कांद्याचे बाजारभाव किमान रु. 1 हजार ते रु. 3 हजार 950 तर सरासरी रु. 3 हजार 400 प्रति क्विंटल पर्यंत होते. तर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. 1 हजार 500 ते रु. 4 हजार 651 तर सरासरी रु. 3 हजार 800 प्रति क्विंटल पर्यंत होते.

तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक 5 हजार 445 क्विंटल झाली असून लाल कांद्याचे बाजारभाव किमान रु. 1 हजार ते कमाल रु. 3 हजार 750 तर सरासरी रु. 3 हजार 100 प्रति क्विंटल पर्यंत होते. तर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. 1 हजार 300 ते कमाल रु. 4 हजार 666 तर सरासरी रु. 3 हजार 600 प्रति क्विंटल पर्यंत होते.

गव्हाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकुण आवक 110 क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान रु. 1 हजार 541 ते कमाल रु. 1 हजार 885 तर सरासरी रु. 1 हजार 616 पर्यंत होते.

बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात घसरण झाल्याचे दिसुन आले. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी कमी राहिल्याने बाजारभावात घसरण झाली. सप्ताहात बाजरीची एकुण आवक 42 क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान रु. 1 हजार 61 ते कमाल रु. 1 हजार 149 तर सरासरी रु. 1 हजार 126 पर्यंत होते.

हरभर्‍याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. हरभर्‍यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभर्‍याची एकुण आवक 23 क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान रु. 4 हजार 41 ते कमाल रु. 5 हजार 252 तर सरासरी रु. 4 हजार 300 पर्यंत होते.

मुगाची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. मुगास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण असल्यामुळे बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मुगाची एकुण आवक 55 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. 3 हजार 200 ते कमाल रु. 5 हजार 220 तर सरासरी रु. 4 हजार 215 पर्यंत होते.

सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयबीनची एकुण आवक 112 क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान रु.2 हजार 500 ते कमाल रु.2 हजार 751 तर सरासरी रु. 2 हजार 600 पर्यंत होते.

मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात घसरण झाल्याचे दिसुन आले. मकास व्यापारी वर्गाची मागणी कमी राहिल्याने बाजारभावात घसरण झाली. सप्ताहात मकाची एकुण आवक 7 हजार 573 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. 950 ते कमाल रु. 1 हजार 115 तर सरासरी रु. 1 हजार 51 प्रति क्विंटल पर्यंत होते.

तसेच उपबाजार अंदरसुल येथे मकाची एकुण आवक 2 हजार 130 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. 908 ते कमाल रु. 1 हजार 135 तर सरासरी रु. 1 हजार 49 प्रति क्विंटल पर्यंत होते तर उपबाजार पाटोदा येथे मक्याची एकुण आवक 562 क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान रु. 950 ते कमाल रु. 1 हजार 56 तर सरासरी रु. 1 हजार प्रति क्विंटल पर्यंत होते.

LEAVE A REPLY

*