Video : येवला शहरात पतंगोत्सवाचा पारंपरिक जल्लोष

0

नाशिक, ता. १४ :

मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरात सकाळपासूनच पतंग उडविण्यासाठी येवलेकर घराच्या टेरेस आणि गच्चीवर जमली असून यंदाही मोठ्या उत्साहात पतंगबाजी करण्यात येत आहे.

येवल्यातील पतंगोत्सवाला दीर्घकालिन परंपरा आहे. या पतंगोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे खास बांबूपासून तयार केलेली आसारी मांजासाठी वापरली जाते.

विविधरंगी पतंगांनी आज आकाशात गर्दी केलेली असते. एखाद्याची पतंग कटली तर वय वय वाकड असा जल्लोष केला जातो.

आज सकाळपासूनच डीजेच्या तालावर येवल्यात पतंग उडविण्यात येत असून अनेकजण दुपारचे जेवणही घराच्या गच्चीवरच घेत असतात.

पतंग महोत्सवाची अनेक वर्षांची परंपरा येवलेकरांनी यंदाही मोठ्या उत्साहाने जपली आहे.

LEAVE A REPLY

*