विनोद निर्मिती कठीण!

0
विनोदी कलाकार म्हणून लोकांना हसवत ठेवणे कठिण काम आहे. दर आठवड्याला वेगळी स्क्रिट, वेगळ्या भूमिका, वेगळे संदर्भ घेऊन काम करणे म्हणजे कलाकरांचा कस लागतो. कधी तुमच्या कामाचे खूप कौतुक होते तर कधी तुम्हाचा कार्यक्रम फार सुमार झाला असे सुनावून दर्शक कान पकडतात. पण हे सर्व स्वीकारत रोज नवीन शिक्षणे हे यशाचे गमक असते. त्यामुळे मी स्वीकारलेले माझे काम हीच पूजा आहे, असे सांगत आहे ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे. माझ्या आईला अभिनाची विलक्षण आवड होती. विवाहापूर्वी तिने काही नाटकांमध्ये अभिनय देखील केला आहे. आपल्या मुलांपैकी कुणीतरी अभिनयाकडे वळावे असे तिला वाटे.

म्हणूनच माझ्यातील गूण ओळखून आईने मला अभिनयासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या आठव्या वर्षी मी पहिल्यांदा बालनाट्य केले आणि तिथून अभिनय प्रवासला सुरूवात झाली. लहान मुलामध्ये असणारा खट्याळपणा माझ्यात अधिकच होता. त्यामुळे मी बालपणी शिक्षक, नातेवाईक यांच्या नकला करुन दाखवत असे. पूढे लोकलचा प्रवास करताना मी अनेक व्यक्तीचे हावभाव, त्यांची भाषा याचे सुक्ष्म निरीक्षण करत असे. त्याचा उपयोग पूढे वेगवेगळ्या भूमिका साकारताना झाला. त्या काळी सेंट झेविअर्स स्कूलमध्ये असताना अभ्यास, परीक्षा आणि एकांकिकांसाठी तालमी, अभिनय करणे अशी तारेवरीची कसरत करावी लागे, पण ते माझे पॅशन होते. अभिनयात करिअर करणार हे त्यावेळी निश्चित केले नव्हेत. आई-वडिलांना मला पत्रकार झालेले पहायचे होते.

मलाही पत्रकारितेची विशेष आवड होतीच. त्यामुळेच पत्रकारितेचा जाहिरात अणि जनसंपर्क हा शिक्षणक्रम पूर्ण केला. परंतु पत्रकारितेचे पेक्षा नाटक, मालिका आणि टीव्हीशो मिळत गेले आणि माझी या क्षेत्रातच आगेकूच होत गेली. वाटेत काचा गंफ हे मी शालेय जीवनात केलेले नाटक माझ्यासाठी मैलाचा दगड ठरले. भारतामध्ये या नाटकाचे सुमारे 300 प्रयोग झाले. केवळ थिएटर्समध्येच नव्हे तर रेडलाईट एरिया, शाळा-महाविद्यालये, रस्त्यावर वस्तू विकणार्‍या मुलांसाठी, वारांगणाच्या मुलांसाठी असे देश-विदेशात याचे प्रयोग झाले.

एडस् जागृतीवरील दिल मांगे मोअरफंया दोन नाटकांनी मला खूप शिकवले. दोन्ही नाटकांमधून समाज जाणीवा जागृत करण्याच्या प्रयत्नात एक कलाकार माझाही मोठा वाटा राहिला याचे मोठे समाधान वाटते. मात्र माणूस म्हणून या नाटकांनी माझ्या जाणीवा अधिकच प्रगल्भ केल्या हे विशेषत्वाने नमूद करते. पुढे महाविद्यालयीन जीवनात इंटरकॉलेज एकांकिका स्पर्धांमध्ये मी मराठीसह गुजराती एकांकिकाही केल्यात. त्या पाहून गुजराती रंगभुमीवरील निर्माते संजय गोराडिया यांनी मला त्यांच्या जंतरमंतर गुजराती व्यावसायिक नाटकात प्रथम संधी दिली. दूरदर्शन आणि इतर खासगी वाहिन्यांवरील मालिकामध्ये मी प्रथम काम केले आणि नंतर नाटके असा माझा उलटा प्रवास झाला.

दरम्यान, तू तिथे मी, अस्मिता, माझे मन तुझे झाले या मालिकांमधून काम केले परंतु फूं बाई फूं मध्ये मिळालेली संधी माझ्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. तिथे वेगवेगळे स्किटफ करताना मजा आली. दर्शकांनाही माझी विविध रुपे भावली. हे काम पाहून निवेदक डॉ. निलेश साबळे यांनी मला चला हवा येऊ द्याफ मध्ये संधी दिली. डॉ. साबळेसह, भाऊ कदम, भारत गणेशपूरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे या कलाकारांमध्ये मी एकमेव स्त्री कलाकार म्हणून काम करत होते. मात्र या सर्वांकडून मला खूप शिकायला मिळाले. अगंविक्षेप न करता केवळ अचुक टायमिंग साधत अत्यंत शांत अभिनयातून विनोद निर्मिती करणे हा भाऊंचा गूण मला खूप आवडतो.

 

कमीत कमी वेळात अधिकाधिक हास्य निर्मिती कशी करावी हे भाऊंकडून शिकत आहे. ङ्गचला हवा येऊ द्याफसाठी केले जाणारे शुटिंंग, तिथला अभिनय नाटकात काम करण्यासारखाच अनुभव देणारा विलक्षण सुंदर प्रवास आहे. तिथे मालिकांसारखे रिटेक नसतात. विविध ठिकाणी लावलेल्या कॅमेरार्‍यामुळे विविध कोनातून चित्रीकरण केले जाते. त्यामुळे मला रंगभूमीवर काम केल्याचा आनंद मिळतो. चित्रपटसृष्टीतल एखादा कलाकार तुमचा चाहता असतो. शाहरुख खान माझा आवडता कलाकार आहे. बालपणापासून ती त्याचे चित्रपट पाहत होते.

भविष्यात त्याच्याशी भेटून त्याच्या समोर अभिनय करु असे स्वप्नातही वाटले नव्हते परंतु चला हवा येऊ द्याफ मुळे शाहरुखला दोन वेळा भेटण्याचा योग आला. तो क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय ठरला. त्याला भेटून बोलून त्याच्या समोर अभिनय करण्याचे स्वप्न ज्या दिवशी पूर्ण झाले तो आनंद मी शब्दात नाही सांगू शकणार. दूरदर्शन वरील अलबेली कहानी प्यार की या मालिकेतही काम केले. हिंदी मालिकांमध्ये काम करणे मला आवडते. मात्र मराठी कार्यक्रम आणि हिंदी मालिका यांच्या शुटिंगसाठी मला वेळ देणे जमत नव्हते म्हणून हिंदी मालिका करणे जमले नाही. परंतु संधी मिळताच मी तिथेही काम करणार त्यामुळे विविध भाषांमधील कामाचे संतुलन जमते.

 

विनोद निर्मिती ही खूप कठिण गोष्ट आहे. काहीतरी करुन तूम्ही दर्शकांना खळखळून नाही हसवू शकत. अनुष्का शर्मा. मी तिची काय नक्कल करणार ? परंतु माझे विनोद पाहून ती हसत होती. तिचीच नक्कल करुन मी दर्शकांना हसवले. इथे माझा हजारजवाबीपणा कामी आला. परंतु दरवेळी असे होत नाही. श्रीदेवी समोर तिचीच भूमिका करणे प्रचंड आव्हानात्मक काम होते. परंतु मी तिचाच अभिनय तिच्या समोर केला आणि तिनेही उत्स्फूर्तपणे दाद देत माझे कौतुक केले.

पूण्यामध्ये असताना एक आजी मला भेटल्या, त्या कर्करोगाने आजारी होत्या. मला भेटताच त्यांनी मिठी मारली आणि चला हवा येऊ द्याफ च्या चमूचे तोंडभरून कौतुक केले. माझ्या उर्वरित थोड्या आयुष्यात तुमच्या कार्यक्रमाने मला खूप हसवले आनंद दिला. त्यामुळे माझा आजार मानसिक स्तरावर कमी झाला. तुमच्यामुळे मी बोनस लाईफ आनंदाने जगते अशी प्रतिक्रिया दिली. विदेशात गेले असताना एका भारतीय आजीबाईंनी आमच्या टीमला पाहताच चक्क सर्वांचे चरण स्पर्श करुन कामाचे कौतुक केले होते. चाहत्यांचे असे प्रेम पाहून समाधान मिळते.

चला हवा येऊ द्याफ ची हवा जगभर पसरली परंतु ती माझ्या डोक्यात या यशाची हवा जाऊ नये यासाठी मला आई-वडिलांचे सुसंस्कार कामी येतात. ङ्गलाईमलाईटफ मध्ये राहून डाऊन टू अर्थफ राहण्याचा संस्कार वडिलांनी दिला. आजवरचा माझा प्रवाश यश हे केवळ आई-वडिलांचा आशीर्वाद आहे. विनोदी कलाकार म्हणून लोकांना हसवत ठेवणे कठिण काम आहे. दर आठवड्याला वेगळी स्क्रिट, वेगळ्या भूमिका, वेगळे संदर्भ घेऊन काम करणे म्हणजे कलाकरांचा कस लागतो. कधी तुमच्या कामाचे खूप कौतुक होते तर कधी तुम्हाचा कार्यक्रम फार सुमार झाला असे सुनावून दर्शक कान पकडतात. पण हे सर्व स्वीकारत रोज नवीन शिक्षणे हे यशाचे गमक असते. त्यामुळे मी स्वीकारलेले माझे काम हीच पूजा मानते.

चला हवा येऊ द्याफ मध्ये जो अभिनय करुन मी हसवते त्यापेक्षा अगदी वेगळ्या रुपात मी एका व्यावसायिक नाटकात रसिकांच्या भेटील येत आहे. त्यातील भूमिका एकदम वेगळ्या धाटणीची आहे. ती रसिकांना नक्किच आवडेल. चित्रपटात काम करण्यास खूप उत्सूक आहे. संधी मिळताच मोठ्या पडद्यावरही येण्यासाठी मी सज्ज आहे.

(शब्दांकन : निल कुलकर्णी)

LEAVE A REPLY

*