रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या भाजी बाजाराचे होणार स्थलांतर

0

नाशिक । दि. 28 प्रतिनिधी

शहरातील रस्त्यांवर भरणारया भाजी बाजारामुळे निर्माण होणारया वाहतुक कोंडीच्या तक्रारी वाढत असून वाहतूकीला अडथळा ठरणारे भाजी बाजार अन्यत्र स्थलांतरीत करण्याचा निर्णय शहर सुधार समितीच्या बैठकित घेण्यात आला. तसेच शहरात शहरात नव्याने भाजी बाजारांचे नियोजन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

शहरात पालिकेने ठरवून दिलेल्या जागेवर बसण्याऐवजी ग्राहक मिळतील अशा ठिकाणी बाजार बसतं असल्याने त्यातून वाहतुक खोळंबणे आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.

गंगाघाट, देवळाली गाव, सातपूर, अंबड येथे पांरपारीक पध्दतीने भाजी बाजार भरतात त्या व्यतिरिक्त शहरात महापालिकेने ठरवून दिलेल्या जागांवर भाजी मंडई आहे.

परंतु प्रत्येक बाजाराच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने त्या जागा अपुर्‍या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नवीन भाजी बाजार निर्माण करण्याचा निर्णय शहर सुधार समितीचे सभापती भगवान दोंदे यांनी आज समितीच्या बैठकीत जाहिर केला.

धोरणात्मक निर्णयासाठी सदरचा प्रस्ताव महासभेवर ठेवला जाणार आहे. समितीच्या उपसभापती स्वाती भामरे, सदस्या सत्यभामा गाडेकर, पंडीत आवारे आज झालेल्या समितीच्या बैठकीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*