वावी येथे भरदिवसा घरफोडी; सोने व रोख रक्कम लंपास

0

सिन्नर (वार्ताहर) ता. ४ : वावी येथे भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सोने व रोख रक्कम लंपास केली.

वावी येथील महाराष्ट्र बँकेजवळ राहणारे भाऊसाहेब पाराजी रकटे हे खाजगी वाहनावर चालक असून त्यांची पत्नी शेतात मजुरीचे काम करते.

सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास रकटे यांची पत्नी घर बंद करून नेहमीप्रमाणे कामावर गेल्या असता चोरीचा सदर प्रकार घडला.

घरातील सामानाची उचक पाचक करून चोरट्यांनी डब्यात ठेवलेले 3 तोळे सोन्याचे दागिने व 15 हजाराची रक्कम लांबवली. दुपारी 12.30 च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

LEAVE A REPLY

*