ठाणे पोलिस मॅरेथॉनमध्ये सिन्नरच्या खेळाडूंनी मारली बाजी

0

चापडगांव (वार्ताहर) ता. ६ : मूळ सिन्नर तालुक्यातील व सध्या ठाणे पोलिस दलात कार्यरत असलेल्या मॅरेथॉनपटूंनी प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली.

ठाणे पोलिस कमिशनर मँरेथाँन मध्ये सलग दोन वर्ष 21 कि.मी मध्ये दशरथ मेंगाळ याने 1 तास 26 मिनिटे 37 सेकंदात अंतर पार करून, तर मोहन गिऱ्हे याने  5 कि .मी अंतर 17 मिनिट 57 सेकंदात पार करून प्रथम क्रमांक पटकविला.

रामनाथ मेंगाळ, ठाणे पोलिस यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. मिळाले. या दोन्ही खेळाडूंचे 10वी पर्यतचे शिक्षण  न्यू इंग्लिश दापूर व पुढील शिक्षण सिन्नर येथे झाले.

अभिनेता ऋतिक रोशन, सुनिल शे्ट्टी, अभिनेत्री जँकलिन फर्नांडीस यांच्या हस्ते विजेत्यांना सायकल आणि पारितोषिक देण्यात आले.

LEAVE A REPLY

*