चौथीतील तनिष्काने पटकावले बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मानांकन

0
नाशिक, ता. २ : बुद्धीबळासारख्या खेळात आता ग्रामीण भागातील खेळाडू मागे नाहीत. आंबे दिंडोरी येथील बुद्धिबळ खेळाडू तनिष्का अनिल राठी हिला बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय मानांकन रॅपीड रेटिंग 1173 प्राप्त झाले. ती आदर्श विद्यालयात इयत्ता 4 ची विद्यार्थिनी आहे.

तिच्या यशात तिची बहीण व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू धनश्रीचा सिंहाचा वाटा आहे. तिला अमित तारे,  मंगेश गंभीर, विनय बेळे, जयराम सोनवणे, सुनील शर्मा, श्री. भागवत यांचे मार्गदर्शन लाभले.

ती लवकरच होणाऱ्या राज्यस्तरिय पातळीवर नंदुरबार व जालना येथे बुद्धीबळ खेळणार आहेत

शाळेचे विश्वस्त विनोद कपूर, साई खाडे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*