मुंढेंच्या ‘टॉक विथ कमिशनर’चा धसका; संभाजी क्रीडा संकुल चकाचक

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) ता. १८ : एरवी देखभाल आणि स्वच्छतेकडे कानाडोळा करणाऱ्या मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘टॉक विथ कमिशनर’चा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे.

नवीन नाशिक येथे उद्या शनिवारी सकाळी साडेसहाला हा कार्यक्रम होणार आहे. स्वत: आयुक्त कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच धसका घेत आज सफाईची तत्परत दाखविली.

आज मनपा विभागीय अधिकारी डॉ.सुनीता कुमावत यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आज चक्क कडक उन्हात क्रीडासंकुलतील पूर्व तयारी व परिसर स्वच्छतेची पाहणी केली.

यावेळी क्रीडासंकुलाच्या साफसफाईकडे विशेष लक्ष देण्यात आले असून त्यासाठी स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेषत्वाने काळजी घेताना दिसून येत आहेत.

याशिवाय आयुक्त परिसरातील मनपाच्या शाळांना भेट देण्याची शक्यता असल्याने येथील शाळा व परिसराचीही स्वच्छता करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*