सुरगाणा-गुजरात महामार्गावरील टपऱ्यांवर होते दारु विक्री

0

सुरगाणा। दि. 1 प्रतिनिधी
सुरगाणा-गुजरात वासदा महामार्गावर खुलेआम टपर्‍यांवर देशी, विदेशी दारू विक्री सर्रसपर्ण होत आहे. त्यामुळे दारुच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनतेमुळे अनेक अघटीत घटना घडत आहे. यासंदर्भात पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

सुरगाणा ते उंंबरठाण, हा गुजरात मघील धरमपुर, वासदा, सुरतकडे जाणारा महामार्ग आहे. हा महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत आहे. रस्ता चांगला झाल्याने या रस्त्यावरुन युवक मद्यप्राशन करून सुसाट वेगाने मोटार सायकली चालवताना आढळून येतात.

त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. उंबरठाण ते वासदा या महामार्गावर बर्डीपाडापर्यंत खुलेआम टपर्‍यांवरती दमन येथून तस्करी केलेली देशी, विदेशी दारू स्वस्तात उपलब्ध होते. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी राजरोसपणे होत असलेली दारु विक्री थांबवावी.

महामार्गालगत दारु विकणार्‍यांवर कठोर कारवाई कारवीे अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भोरमाळ, अंबाठा, वांगणबारी या घाटाचा चढ कमी करतांना केलेल्या खोदकामामुळे रस्त्याच्या कडेला असणारी झाडाच्या मुळांवरील माती काढल्याने झाडांची मुळे उघडी पडली आहे. काही प्रमाणात पावसात माती धुवून गेली आहे.

त्यामुळे अशी झाडे केव्हा कोसळून पडतील हे सांगता येत नाही.वादळात अचानक झाड कोसळल्यास हकनाक बळी जाऊ शकतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या अशा वृक्षांची तोड करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात येत आहे.

गेल्या पावसाळ्यात सापुतारा महामार्गावर वाळलेले झाड कारवर कोसळून सुरत येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा चिरडून मृत्यु झाला होता.त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली वाळलेली झाडे,मुळ्या उघडी पडलेली झाडे तोडुन संभव्य धोका टाळता येईल यासाठी बांधकाम विभागाने वेळीच उपाय योजना कराव्या अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे .

LEAVE A REPLY

*