घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता सुरेश कोकणे यांची निवड झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी. (छायाचित्र : वाल्मिक गवांदे, इगतपुरी)

इगतपुरी । दि. १६ प्रतिनिधी :  इगतपुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता सुरेश कोकणे यांची आज निवड झाली.

ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने सरपंचपद पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. पार्वताबाई एकनाथ फोकणे, तान्हुबाई दत्तू रोंगटे या दोघींना पराभव स्वीकारावा लागला.

अध्यासीन अधिकारी तथा नांदगाव बुद्रूकचे मंडळ अधिकारी नितीन बाहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेल्या विशेष बैठकीत ही निवड झाली. काही महिन्यांपूर्वी मीराबाई ज्ञानेश्वर फोकणे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. म्हणून सरपंच निवडणूक घेण्यात आली.

ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेलचे घोटी खुर्द ग्रामपंचायतीत वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सुनीता सुरेश कोकणे यांच्यासह  पार्वताबाई एकनाथ फोकणे, तान्हुबाई दत्तू रोंगटे यांचे अर्ज दाखल झाले.

अधिक अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली. यावेळी ५ मते मिळाल्याने सुनीता सुरेश कोकणे यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे, सुरेश जाधव, ज्ञानेश्वर लोहरे, वनिता म्हसळे, पार्वताबाई फोकणे, अश्विनी निसरड, तान्हुबाई रोंगटे उपस्थित होत्या.

अध्यासीन अधिकारी तथा नांदगाव बुद्रूकचे मंडळ अधिकारी नितीन बाहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक डी. बी. कोळपे, कर्मचारी शिवाजी कोकणे, पोलीस पाटील कैलास फोकणे आदींनी कामकाज पाहिले.

श्रीराम फोकणे, दत्तू फोकणे, गणेश फोकणे, रघुनाथ कोकणे, पांडुरंग रोंगटे, दत्तू रोंगटे, एकनाथ म्हसळे, विष्णू गोडसे, सचिन कोकणे, नाना निसरड, सुरेश रोंगटे, जनार्दन निसरड, उद्धव रोंगटे, भगवान निसरड, भाऊसाहेब फोकणे, नितीन कोकणे आदींनी नवनियुक्त सरपंच सुनीता सुरेश कोकणे यांचे अभिनंदन केले. ग्रामस्थांनी निवडीचे स्वागत करून जल्लोष केला.

LEAVE A REPLY

*