राज्यस्तरिय पुरुष फुटबॉल कोल्हापुर आणि नागपूर संघादरम्यान अंतिम सामना

0

नाशिक, ता. ९  : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर खुलागट पुरुष फुटबॉल स्पर्धेच्या आजच्या सहाव्या दिवशी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी पुणे आणि कोल्हापुर तर मुंबई आणि नागपुर संघात जोरदार संघर्ष झाला.

आज सकाळच्या सत्रात पुणे विरुध्द कोल्हापुर या संघांमध्ये झालेल्या पहील्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दोनही संघांनी अत्यंत अप्रतिम खेळ करुन प्रेक्षकांची मने जिंकली. या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात पुणे आणि कोल्हापुर संघांनी आपआपली संपुर्ण शक्ती पणाला लावुन गोल करण्याचे अनुक सुंदर प्रयत्न केले, पण या दोनही संघाचा बचाव फळीने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

त्यामुळे सामन्याच्या निर्धारीत वेळेत कोणताही संघ गोल करण्यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे या सामन्याचा निकाल टाय ब्रेकरव्दारे घेण्यात आला. यामध्ये पुणे संघाचा सुरज याने पहीला गोल नोंदवुन आघाडी घेतली, पण लगेचच कोल्हापुर संघाच्या प्रतिकने देखिल अप्रतिम पॅनल्टी किक मारुन संघास बरोबरी साधुन दिली.

या नंतर पुणे संघाच्या साहिलने दसरी पॅनल्टी किक गोलपोस्टच्या बाहेर मारुन संघावरील दडपण वाढवुन घेतले, या उलट कोल्हापुर संघाच्या सिध्देशने दुसरी पॅनल्टी गोलपोस्टमध्ये मारुन कोल्हापुर संघास 2 विरुध्द 1 अशी आघाडी मिळवुन दिली.

तिसऱ्या पॅनल्टी किकव्दारे पुणे संघाच्या श्रीकांतने गोल नोदवुन बरोबरी साधली पण कोल्हापुरच्या संकेतने आपल्या संघासाठी तिसऱ्या पॅनल्टीवर गोल नोंदवून पुन्हा आघाडी घेतली, यानंतर मात्र पुण्याच्या गोल किपरने शुभमचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला व सामन्यात रंगत आणली, पण त्यानंतर लगेचच कोल्भहपुरच्या गोलकिपरने पुण्याच्या गौरवने मारलेला फटका अडवुन आपल्या संघास पुन्हा आघाडीवरच ठेवले शेवटी कोल्हापुर संघाच्या मसुदने गोल करुन आपल्या संघास 4 विरुध्द 2 गोलने विजय मिळवून तर दिलाच पण त्यासोबतच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत घडक मारली.

बलाढ्य मुंबई आणि नागपुर संघातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात देखिल प्रचंड चुरस अनुभवायास मिळाली, मुंबई संघाने वारंवार नागपुर संघाच्या गोल एरीयामध्ये धडक मारुन गोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही.

तसेच नागपुर संघाने देखिल प्रतिआक्रमण करुन पुणे संघास जेरीस आणण्याचा वारंवार प्रयत्न केला. शुवटी सामन्याच्या निर्धारीत वेळेत सामना गोल शुन्य बरोबरीत सुटला. यानंतर घालेल्या टायब्रेकरमध्ये मात्र नागपुर संघाने मुंबई संघाचा 4 विरुध्द 2 गोलने पराभ करुन अंतिम फेरी गाठली.

रविवारी या स्पर्धेतील नागपुर आणि कोल्हापुर या संघा दरम्यान अंतिम सामना सकाळी 8.00 वाजता विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे रंगणार असुन या सामन्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, तसेच वेस्टर्न इंडीया फुटबॉल असोसिएशनचे सचिव साऊटर वाझ, इस्पेलियर स्कुलचे सचिन जोशी , स्व. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता सौ. पाटील, तसेच नाशिकचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी सचिव अर्जुन टिळे आदी उपस्थित राहणार आहेत. या सामन्यानंतर लगेचच बक्षिस वितरण कार्यक्रम संपंन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

*