ब्रेकिंग न्यूज : अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू पाण्यात बुडून; अल्कोहोलचे अंश सापडले

0

दुबई पोलिसांच्या न्यायवैद्यक विभागने विविध तपासण्या केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार तिचा मृत्यू अपघाताने पाण्यात बुडून ( ॲक्सीडेंटल ड्रावनिंग) झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच तिच्या शरीरात अल्कोहोलचे अंशही सापड्याचे या अहवालातून पुढे आल्याने या प्रकरणाला गुढ वलय प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

श्रीदेवीचा मृतदेह भारतात आणण्याचा मार्ग या अहवालानंतर मोकळा झाला आहे.  दुबई पोलिसांनी हा अहवाल बंद पाकिटात भारतीय दूतावास आणि कपूर कुटुंबियांना आज सोपविला.

मात्र हा अहवाल बुर्ज पोलिसांकडे देण्यात आला आणि त्यानंतर तेथून तो कुटुंबियांना प्राप्त झाला.

दुबईतील गल्फ न्यूजने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले असून त्यानुसार श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज दुबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्राप्त झालेल्या न्यायवैद्यक अहवालात केवळ अपघाताने बुडून मृत्यू असे नमूद केले असले तरी या प्रकरणाचा सर्वंकश तपास दुबई पोलिस करत असल्याचे वृत्तही संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने गल्फ न्यूज ने दिले आहे.


(व्हिडिओ सौजन्य गल्फ न्यूजचे फेसबुक पेज)

दुबईतील गल्फ न्यूजने हा अहवाल काही वेळापूर्वी प्रसिद्ध केल्यानंतर एएनआय न्यूज एजन्सीसह अनेक माध्यमांमध्ये तो व्हायरल झाला आहे.

दरम्यान आधी श्रीदेवीला श्रद्धांजली वाहण्याच्या संदेशानंतर सोशल माध्यमांमध्ये कालपासून तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता.

आज मध्यरात्री शव येण्याची शक्यता; उद्या सकाळी अंत्यविधी

दरम्यान आज मध्यरात्रीच्या सुमारास श्रीदेवी यांचे शव मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या शव आणण्याच्या प्रक्रियेला आणखी चार तास लागणार आहेत. कस्टम विभाग, पोलिस यांची एनओसी अजून बाकी असून ही कागदपत्रांची पूर्तता आज रात्री साडेआठपर्यंत होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर रात्री ९च्या सुमारास विमानाने शव मुंबईत आणले जाईल. त्यानंतर वर्सोवा येथील निवासस्थानी शव नेण्यात येऊन शेजारी असलेल्या रिक्रीएशन क्लबमध्ये उद्या सकाळी दर्शनासाठी ठेवण्यात येईल.

सकाळी अकराच्या सुमारास पवन हंस स्मशानभूमीत हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार होणार आहेत.

हॉटेलमधील बाथटबमध्ये निष्प्राण पडली होती श्रीदेवी…

दुबईतील हॉटेलमध्ये असलेल्या मुक्कामादरम्यान अभिनेत्री श्रीदेवीला तीव्र हृदयविकाराचा धक्का बसला आणि तिचा मृत्यू झाला.

श्रीदेवी परिवारासह आपल्या भाच्याच्या लग्नासाठी येथे आली होती. जुमेरा एमिरेटस्‌ हॉटेलमध्ये ती वास्तव्याला होती. पती बोनी कपूर यांच्यासोबत रात्रीच्या जेवणासाठी ती तयार होत होती. मात्र त्याचवेळेस तो दूर्धर प्रसंग कपूर कुटुंबावर आला आणि त्यात तिचा अंत झाला.

येथील खलिज टाईम्सने कपूर परिवाराशी संपर्क करून या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार बोनी कपूर मुंबईला आले होते. मात्र श्रीदेवीला ‘सरप्राईझ’ देण्यासाठी ते पुन्हा शनिवारी दुबईला परतले.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार श्रीदेवीला सायंकाळी पाचच्या सुमारास झोपेतून उठविण्यात आले होते. त्यांच्यासोबत पती बोनी कपूर यांचे बोलणेही झाले.

त्यानंतर डिनरला जाण्याबद्दल तिला सांगितले. त्यामुळे तयार होण्यासाठी श्रीदेवी बाथरूममध्ये गेली पण बराच वेळ बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी दरवाजा वाजवला.

तो उघडला न गेल्याने त्यांनी तो धक्का मारून उघडला तेव्हा ती बाथटबमध्ये निष्प्राण पडलेली दिसली. आणि टब पाण्याने भरलेला होता. त्यांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला.

त्यानंतर त्यांनी मित्रांना बोलावले आणि रात्री ९च्यां सुमारास पोलिसांना कळविले.

हा सर्व वृत्तांना खलिज टाईम्सने आज प्रसिद्ध केला आहे. दरम्यान तिला हृदयरोगाचा त्रास नसल्याचे तिच्या परिवाराने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

*