सिन्नरला बसस्थानकाजवळून 1.80 लाख लांबवले

0

सिन्नर बसस्थानक प्रवेशद्वारावर दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी तरुणांनी एसटी कर्मचाऱ्याचे हातातील हँडबॅग हिसकावून घेत 1.80 लाखांची रक्कम लांबवल्याची घटना आज दि. ४ सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

मुलीच्या लग्नातील उधारी चुकती करण्यासाठी एसटीचे लिपिक पी.वाय. पवार यांनी बसस्थानक समोरच्या एस बी आय  च्या शाखेतून ही रक्कम काढली होती. पवार यांनी सिन्नर पोलिसात लेखी तक्रार दिल्यावर पोलिसांनी बँकेत येऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र कुठलीही संशयास्पद हालचाल दिसली नाही.

दरम्यान याबाबत पोलिसांना विचारले असता कानावर हात ठेवत माहिती द्यायला ठाणे अमलदाराने सपशेल नकार दिला.

LEAVE A REPLY

*