नाशिकच्या सिंहगर्जना पथकाने दिली रायगडावर ढोल ताशांची मानवंदना

0

नाशिक, ता. १६ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने १४ मे रोजी नाशिकच्या सिंहगर्जना पथकातर्फे ऐतिहासिक किल्ले रायगडावर ११ ध्वज आणि ढोल ताशांची मानवंदना दिली.

या कार्यक्रमात ५० वादकांनी सहभाग घेतला होता. जगदीश्वर मंदिरापर्यंत पालखी काढून ढोल ताशांच्या गजरात ही मानवंदना देण्यात आली.

यावेळी लाठी, चक्र, दांडपट्टा, अशा विविध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकही करण्यात आले. पथकातर्फे गडावर स्वच्छता मोहिमही राबविण्यात आली.

कार्यक्रमात सिंहगर्जना युवा मंच पथकाचे संस्थापक अध्यक्ष प्रितम प्रेमराज भामरे, पवन माळवे, रश्मीन तांबट, रोहित खुळे, आदित्य नेरे , सचिन गुडघे, अविनाश दळवी, गणेश रायते,  रवि पिंगळे, संतोष गुप्ता, राकेश पंचाक्षरी, मोहन बोढाइ, सागर डोखे ,राहुल परदेशी ,रोहित देशमुख, प्रसाद जाधव, हर्षल पालवे ,विनायक पवार, सागर धारणकर, वैभव आहेर, ऋषी तुपे, विजय घटोळ, किरण आंबेकर, भरत तळेकर, अक्षय गोलाइत, सचिन जाधव, मोहित चौधरी, सचिन निकम, सौरभ पंडित, अक्षय राउत, दीपक टोंगारे, वैभव आठवने, आकाश मोढ़े दादू वाजे, प्रशांत चौधरी, गौरव हिरे, प्रवीण गांगुर्डे, तेजस शिंदे ,दर्शन बोरुड़े, प्रदीप पवार, गणेश शेलके, उत्कर्ष रत्नपारखी, संकेत शिरके, विराट खैरनार, ऋतुराज पाटील, प्रज्वल जाधव आदींनी सहभाग नोंदविला.

 

LEAVE A REPLY

*