शेल्टरच्या माध्यमातून अर्थकारणास मिळणार बुस्ट

क्रेडाई अध्यक्ष कोतवाल; 21 डिसेंबरपासून गृहप्रदर्शन

0

नाशिक । दि. 1 प्रतिनिधी
क्रेडाई नाशिक आयोजित शेल्टर 2017 प्रदर्शन फक्त गृहप्रकल्पांचेच प्रदर्शन नसून यामध्ये नाशिकमधील साहित्य, कला, उद्योग, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन, वाईन उद्योग आदींचेही ब्रॅण्डिंग होणार असल्याने नाशिकच्या अर्थकारणास चालना मिळेल, असा विश्वास क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी व्यक्त केला.

बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईतर्फे गृहस्वप्न साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे शेल्टर गृहप्रदर्शन येत्या 21 ते 25 डिसेंबरदरम्यान ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे क्रेडाईचे सदस्य असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या नाशिकमधील गृहनिर्माण प्रकल्पांविषयीची संपूर्ण माहिती एकाच छताखाली मिळू शकेल.

नाशिकचे भौगोलिक स्थान, उपलब्ध सुविधा आणि नजीकच्या भविष्यातील विकास यामुळे नाशिकमध्ये कुठे व कशा प्रकारच्या जागा, घरे उपलब्ध आहेत, त्यांचे दर काय आहेत हे या प्रदर्शनातून पाहण्यास मिळणार असल्याचे कोतवाल यांनी सांगितले.

आजमितीला 90 टक्क्यांहून अधिक स्टॉल्सचे बुकिंग झाले असून यामध्ये सर्व प्रमुख बांधकाम व्यावसायिक, वित्तीय संस्था, बांधकाम साहित्यातील नामांकित कंपनी, अपरंपरिक ऊर्जा तसेच सेवा पुरवणार्‍या संस्था आदींच्या सहभागाने येणार्‍यांना अनेक पर्याय मिळणार आहेत.

आधुनिकरीत्या उभारण्यात येत असलेल्या प्रदर्शन स्थळामध्ये अ‍ॅम्फी थिएटर, वायफाय झोन, फूड पार्क अशा सुविधा असून रोज संध्याकाळी दर्शकांना विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानीदेखील मिळणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य असे कार्यक्रम असून त्यामुळे प्रदर्शनास भेट देण्याचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

सोबतच अनेक सेमीनार, वर्कशॉपही आयोजित करण्यात आले असून त्याचाही लाभ नाशिककरांना होणार आहे. अनेक स्पर्धादेखील यादरम्यान होणार असून यामध्ये विद्यार्थी व महिलांना सभागी होता येईल, असेही कोतवाल यांनी सांगितले.

सेकंड होम म्हणून नाशिकला जळगाव, धुळे, मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई व औरंगाबाद येथील नागरिकांची पसंती असून शेल्टर 2017 च्या निमित्ताने त्यांनाही सुवर्णसंधी मिळणार असल्याचे प्रदर्शनाचे समन्वयक उदय घुगे यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

*