सातपूरला मोकाट कुत्र्याचा बालिकेला चावा

0

नाशिक, ता. १ : सातपूर परिसरात मोकाट कुत्र्याने बालिकेच्या पायाचा लचका तोडल्याची घटना घडली  आज सकाळी घडली. घटनेनंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी मनपाकडे पाठपुरावा केल्याने कुत्र्याला पकडण्यात आले.

येथील महादेव नगर परिसरात सकाळी कुत्र्याने लहान मुलीला चावा घेऊन जखमी केले. मात्र अजून काही मोठी घटना घडण्याच्या आत सामाजिक कार्यकर्ते नितीन(बाळा)निगळ, चेतन गुंजाळ यांनी तातडीने म.न.पा. अधिकाऱ्यांना फोन लावून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर म.न.पा.कर्मचारी रंगनाथ काळे, योगेश कापडे व त्यांचे कामगार यांनी त्या कुत्र्याला पकडले व घेऊन गेले.

अशा अनेक मोकाट कुत्र्यांना लवकरात लवकर पकडून सामान्य नागरिकांचा त्रास कमी करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.

LEAVE A REPLY

*