आज निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस; जिल्हयात मतदार जागृती

0

नाशिक (गौतम जगताप) ता. २५ : स्वतंत्र भारताचे संविधान अस्तित्वात येऊन २६ जानेवारी १९५० रोजी भारत सार्वभौम प्रजासत्ताक देश झाला. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच २५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली.

त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस मतदार जागृती दिवस म्हणून पाळला जातो. मतदानाचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांना पटावे, त्यांनी मतदानासाठी उद्युक्त व्हावे आणि लोकशाही आणखी बळकट आणि सशक्त व्हावी असा त्या मागचा उदात्त उद्देश आहे.

देशात आज अनेक ठिकाणी आज मतदार जागृती दिवस उत्साहात साजरा झाला. शाळा महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांना अर्थातच होऊ घातलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी मतदानाची शपथ दिली गेली.

सटाणा तालुक्यातील जायखेडा उच्च माध्यमिक विद्यालयातही आज या दिवसानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. विद्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरी काढत तेथील नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी मुख्याध्यापक डी.ए. देवरे, शिक्षक एन. पी. दळवी, जी.आर सोनवणे, एस. डी. कोर, डी.एस यांनी पुढाकार घेतला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि काही ग्रामस्थांनी मतदार जागृतीची आणि लोकशाही बळकटीच्या प्रयत्नाची प्रतिज्ञाही घेतली.

या संदर्भात देशदूतला प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापक देवरे म्हणाले की थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका एका मताने मतांचा डोंगर तयार होतो आणि लोकशाही बळकट करण्याला हातभार लावतो. म्हणूनच आमच्या शाळेने पुढाकार घेऊन ग्रामीण भागात हा उपक्रम राबविला आहे.

LEAVE A REPLY

*