बेटी बचाव बेटी पढ़ाओ’ साठी धावणार नाशिकचे सुभाष जांगड़ा

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. ३० :  नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन चे सेक्रेटरी सुभाष जांगड़ा हे ‘बेटी बचाव बेटी पढ़ाओ’चा संदेश देण्यासाठी नाशिक ते शिर्डी हे ९० किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण करणार आहे.

दि.२ डिसेंबर २०१७ रोजी ते नाशिकच्या गोल्फ मैदान येथून पहाटे ४ वाजता रवाना होणार आहे.

श्री सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून कोलकत्ता रोडवेजचे ते भागीदार आहे. गेल्या दोन वर्षापासून ते नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहे.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतुन नेहमी समाजउपयोगी वेगळे कार्यक्रम  राबवित असतात.

श्री जांगड़ा हे गोल्फ क्लब नाशिकचे सदस्य असून ते रोज आठ ते दहा किलोमीटर धावतात. नाशिक ते शिर्डी न थांबता धावण्यासाठी ते दररोज मेहनत घेत आहे.

त्यांच्या या साहसाबद्दल नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून शुभेच्छा देण्यात आल्या असून त्यांच्या या संकल्पने विषयी कौतुक देखील होत आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे नवनीर्वाचित अध्यक्ष जयपाल शर्मा व वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड़ हे विशेष सहकार्य करत आहे.

LEAVE A REPLY

*