आरटीओत 28 वाहनांचा लिलाव

0

पंचवटी । दि.30 प्रतिनिधी
थकीत कर तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेल्या विविध वाहनांचा आज कार्यालयात लिलाव करण्यात आला.

या लिलावातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 1 लाख 62 हजार रुपयांचा थकीत कराची वसुली केली. यात सुमारे 28 विविध वाहनांचा लिलाव अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाला.

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने थकीत कर न भरणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लघन केल्याने विविध वाहने जप्त केली होती. याबाबत वाहन मालकांना वेळोवेळी थकीत कर भरण्यासाठी दंडात्मक नोटिसा बजावल्या होत्या.

मात्र संबंधित वाहन मालकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कारवाईत जप्त केलेली वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच एसटी वर्कशॉप येथे जमा करण्यात आली होती.

या वाहनांचा आज दुपारी कार्यालयात लिलाव करण्यात आला. या लिलावात सुमारे 23 ऑटोरिक्षा, 2 मालट्रक, 3 व्हॅन अश्या 28 वाहनांचा लिलाव झाला. या लिलावातून 1 लाख 62 हजार रुपयांच्या थकीत कराची वसुली करण्यात आली.

LEAVE A REPLY

*