नाशिक जिल्ह्यात महामार्गावर लूटमार करणारी आंतरराज्य टोळीला अटक

0

नाशिक, ता. ५ : जिल्ह्यात शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून महामार्गावर प्रवासी वाहनांना लुटणाऱ्या टोळीला लासलगाव पोलिस स्टेशन आणि नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

राजेश भानुदास अभंगे (वय २४), आकाश भाऊसाहेब मस्के (२०) दोन्ही रा. खिर्डी गणेश, ता. कोपरगाव जि. नगर आणि त्यांचे साथीदार कृष्णा दिलीप लोंढे ( वय २२, रा. ब्राह्मणगाव, ता. कोपरगाव, अहमदनगर, शुभम सुरेश वाहूळ व राजू मांजरे (रा येसगाव, ता. कोपरगाव जि.नगर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित दरोडे खोरांची नावे आहेत.

५ नोव्हेंबरला मध्यरात्रीचे सुमारास भगूर, ता. नाशिक येथील व्यावसायिक कुटुंबासह नाशिक औरंगाबाद महामार्गावरून नाशिकला येत होते. वाटेत डिझेल संपल्याने भरवस फाट्याजवळ थांबले असता मोटरसायकलवरून आलेल्या संशयितांनी त्यांना चाकूचा धाक दाखवित लुटले होते.

 

या प्रकरणी निफाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक गि-हे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अशोक करपे, लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि जे.बी.सोनवणे, स्थागुशाचे सपोउनि रविंद्र शिलावट, पोना राजु सांगळे, पोकॉ संदिप हांडगे, संदिप लगड, चालक भुषण रानडे तसेच लासलगाव पोलीस ठाण्याचे पोउनि दिनकर मुंढे, पोहवा शहा, राजु पाटील, पोना शिंदे, महाजन, पोकॉ प्रदिप आजगे अशांचे पथकाने संयुक्त कामगिरी करून 04 सरार्इत गुन्हेगारांना ताब्यात घेत दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणला.

LEAVE A REPLY

*