घरफोडी करणारे दोघे गजाआड; सव्वा लाखाचे दागिणे हस्तगत

0

नाशिक । दि. 2 प्रतिनिधी
शहरात घरफोड्या करणार्‍या दोन चोरट्यांना म्हसरूळ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांचे दागिणे व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या दोघांकडून तीन गुन्ह्यांची देखील उकल करण्यात यश आले असून दोघा अल्पवयीनांकडून एक दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे.

तुळशीराम रामदास पागे (वय- 24, वैशालीनगर, पेठरोड, पंचवटी) व प्रशांत उर्फ पप्पू गोपाळ सरदेसाई (वय- 29, रा. रो- हा. नं – 1, गायत्री नगर, राजमाता मंगल कार्यालयाजवळ, मेरी- रासबिहारी लिंक रोड, पंचवटी, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.

याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार येवाजी महाले, पोलीस हवालदार संदीप भांड, पोलीस नाईक उत्तम पवार, सोमनाथ शार्दूल, प्रशांत वालझाडे, टेमगर, दराडे रोकडे याना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने या दोघांना सापळा रचून अटक केली.

त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याच्या कबुली दिली आहे. दरम्यान या दोघांना अटक करण्यात आली असून आणखी दोघा अल्पवयीन बालकांना पथकाने चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

त्यांच्याकडून(एमएच-15-एफसी-2835) या क्रमांकाची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. वरील दोघे संशयित सराईत असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व अल्पवयीनांकडून एक दुचाकी असा 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विभाग एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चव्हाण, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पथकाने केली.

LEAVE A REPLY

*