ग्रहणामुळे रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीचे मंदिर बंद

0

नाशिक, ता ३१ : च्रंदग्रहणाचे वेध आज सकाळी साडेअकराला लागले, त्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार आज रविवार कारंजा येथील प्रसिद्ध चांदीचा गणपतीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.

रात्री ग्रहण सुटल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे. मात्र कपालेश्वरासह शहरातील इतर मंदिरे दर्शनासाठी खुले असल्याचे समजले.

ग्रहणात मंदिरात न जाणे, जप-तप करणे, पूजा-पाठ करणे, दान धर्म करणे, तसेच ग्रहण काळात अन्न ग्रहण न करणे अशी श्रद्धा आजही अनेक जण पाळताना दिसतात.

आज शहरात अनेकांनी ग्रहणानिमित्त पूजा  पाठ, उपास केले होते.

LEAVE A REPLY

*