नाशिक (प्रतिनिधी) ता. २० : सोनईतील प्रकरणातील आरोपींना फाशीपेक्षाही जास्त शिक्षा द्यायला हवी होती इतके हे नृशंस हत्याकांड होते अशी भावनिक प्रतिक्रिया या हत्याकांडातील बळी गेलेल्या राहुल कंडारेचा भाऊ सागर कंडारे यांनी दिली आहे.

या घटनेतील सर्व आरोपींना आज नाशिक न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्यावर प्रतिकिया देताना ते बोलत होते.

(व्हिडिओ : फारूक पठाण, देशदूत)

हा निकाल लागेपर्यंत पाच वर्षांपर्यंतचा काळ उलटला. हे पाच वर्षे आम्ही कसे काढले आम्हालाच माहीत असे सांगून यासंदर्भात सरकारने नोकरी आणि मदतीचे आश्वासन दिले होते. ती अद्यापही मिळाली नसल्याची कैफीयतीही त्यांनी यावेळी मांडली.

दोन वर्षात हा निकाल येणे अपेक्षित होते पण उशिरा निकाल आला तरी न्याय मिळाल्याचे समाधान आहे, वरच्या कोर्टातही त्यांना फाशीच व्हायला पाहिजे असे मतही त्यांनी मांडले.

मृत सचिन घारूची आई कलाबाई घारू यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. त्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही याचा त्यांनीही पुनरूच्चार केला.

या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा सैन्यात असलेल्या पंकज धनवर याने केला होता.  हत्याकांडातील मृत संदीप याचा तो भाऊ आहे. त्याला ही घटना समजल्यानंतर तो रजा घेऊन घरी आला आणि हा खून असल्याचा त्याला संशय आल्याने त्यानेही यासाठी बराच पाठपुरावा केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली होती.

त्यांनी या वेळी ॲड उज्ज्वल निकम यांच्यासह सर्व पाठीराख्यांचे आभार मानले. तसेच ॲड. निकम यांनी यापुढेही आमच्यासारख्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा द्यावा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

 

LEAVE A REPLY

*