चंद्रदर्शन न झाल्याने शुक्रवारचा पहिला रोजा

0
जुने नाशिक । प्रतिनिधी- नाशिक शहरासह जिल्ह्यात तसेच राज्यातील कोणत्याही भागात पवित्र रमजान महिन्याचे चंद्रदर्शन झाले नाही, तर इतर ठिकाणाहून देखील चंद्रदर्शनाची ‘शहादत’ (इस्लामी ग्वाही) न मिळाल्याने इस्लामी चालू शाबान महिन्याचे 30 दिवस पूर्ण करुन शुक्रवारीचा पहिला रोजा ठेवण्यात येणार आहे.

इस्लामी नवीन दिवस सायंकाळपासून सुरू होते, म्हणून आज (दि.17) सायंकाळपासून पवित्र रमजान महिना सुरू होऊन रात्री विशेष ‘तरावी’ ची नमाज मशिदींसह विविध ठिकाणी पठण होणार आहे. आज सायंकाळी मगरीबची नमाज होताच मुस्लिम बांधवांनी चंद्र पाहण्यासाठी गर्दी केली होती.

तर शाही मशिदीत त्वरीत शहरातील मौलानांची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी कुठेही रमजानचे चंद्रदर्शन झाले नसल्याने शुक्रवारी रोजा ठेवण्याचा व गुरुवार सायंकाळपासून रमजान सुरू करुन रात्री तरावीची नमाज पठण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*