नाशिकरोडला सुरू होणार सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकेंद्र

0

नाशिक, ता. १४ – नाशिकरोड येथे येत्या जुलै महिन्यात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु होणार आहे. त्याठिकाणी सुरुवातीला MBA चा अभ्यासक्रम सुरु केला जाईल व त्यासोबत स्थानिक पातळीवतील विषय देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खा.हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

विद्यापीठाचे शहरातील उपकेंद्र तातडीने सक्षम करावे अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी कुलगुरूकंडे केली होती. त्यानुसार दि.१४ जून रोजी कुलगुरूंसोबत दूरध्वनीहून चर्चा केली असता आपण केलेल्या जागेच्या पाहणीनुसार नाशिकरोड येथील के.के.आर्केड या इमारतीतील २० हजार चौ.फुट जागेचा ताबा मिळाला असून त्याचे अंतर्गत काम चालू झाले असल्याची माहिती समजली.

विद्यापीठाचा भार हलका व्हावा यासाठी गेल्या सात वर्षापुर्वी नाशकात उपकेद्र सुरू झाले होते. मात्र अल्पशी जागा, अपुरे मनुष्यबळ, मर्यादित अधिकार आणि साधन सामुग्रीची कमतरता यामुळे उपकेंद्राची अवस्था असून नसल्यासारखीच होती. त्यामुळे महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची फरफट सुरूच होती. या विषयीच्या आलेल्या तक्रारीची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये कुलगुरू नितीन करमळकर यांची भेट घेतली असता त्यांना नाशिक येथे बंद अवस्थेत असलेल्या उपकेंद्राची माहिती दिली.

उपकेंद्र प्रशस्त इमारतीत असावे, पुरेसे कर्मचारी असावेत, उपकेंद्रात विभागवार कक्ष निमिर्ती करावी, विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तसेच हॉल तिकीटात बदल करण्याचे अधिकार उपकेंद्राला असावेत, पेपर सेटींग करण्याचे काम उपकेंद्रातच करावे, परिक्षेसंदर्भातील सर्व पत्रव्यवहार उपकेंद्रातच स्वीकारावा, पी.जी. आणि पी.एच.डी. शिक्षकांना मान्यतेसाठी द्यावी लागणारी हार्डकॉपी उपकेंद्रात जमा करण्याची सुविधा असावी, महाविद्यालयाच्या प्रोफाईलमध्ये बदल करून देण्याची सोय उपकेंद्रात असावी अशा सूचना यावेळी खा.गोडसे यांनी कुलगुरूंना केल्या होत्या.

आपल्या मागण्या योग्य असून त्यावर लवकरच निर्णय घेवू अशी ग्वाही यावेळी करमळकर यांनी दिलीहि होती. सुसज्य कार्यालयासाठी वीस हजार स्वेअरफूट जागेची गरज असून जागेच्या पाहणीसाठी कुलगुरू स्वतः नाशिकमध्ये आले होते. या इमारतीतच पैठणी, फळबागा, दाक्ष- कांदा आणि निर्यात या विषयांवर आधारित नव्याने चार अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे त्यावेळी कुलगुरू करमळकर यांनी देखील केले होते.

LEAVE A REPLY

*