शहरातून चार दुचाकी लंपास

0

नाशिक । दि. 1 प्रतिनिधी
शहरात वाहन चोरीची मालिका सुरूच असून दोन दिवसांत विविध ठिकाणांवरून चार मोटारसायकली चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा, आडगाव, म्हसरूळ, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आल्या आहेत.

मखमलाबाद रोड परिसरातील सुनील बाबूराव धात्रक (रा.रामसृष्टी सोसा., स्वामी विवेकानंदनगर) यांची यामाहा (एमएच 15 एफसी 2835) गुरुवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.

तर जेलरोड येथील त्रिमूर्तीनगर भागात राहणारे विनोद शिवराम गरूड यांची स्प्लेंडर (एमएच 15 डीडब्ल्यू 6668) रविवारी रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरीस गेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.

देवळा येथील सागर दिलीप सोनगिरे हे 11 ऑगस्ट रोजी नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. शरणपूररोडवरील राज अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या नातेवाईकांकडे ते मुक्कामी थांबले असता अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये लावलेली त्यांची मोटारसायकल (एमएच 41 एएफ 9555) चोरून नेली.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत. चौथी घटना औरंगाबाद रोडवरील नांदूरनाका भागात घडली.

सिन्नर येथील पोपट आनंदा कातकाडे हे शुक्रवारी विवाह सोहळ्यानिमित्त सायंकाळी मिरची हॉटेलनजीकच्या गुरुदत्त लॉन्स येथे आले असता ही घटना घडली. लॉन्सच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर (एमएच 15 सीए 2945) चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी आडगाव पोलिसांत गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*