फेर्‍यांसाठी एसटी वाहक-चालकांचे आंदोलन; रोखून धरल्या बस

0

नाशिक । दि. 16 प्रतिनिधी
मनपाकडे एसटीची शहर बस वाहतूक वर्ग करण्याच्या नावाखाली एसटी महामंडळाच्या नाशिक विभागातील आगार क्रमांकच्या प्रशासनाने गेल्या 15 दिवसांपासून शहर वाहतूकीच्या गाड्यांच्या फेर्‍या बंद केलेल्या आहेत.

त्यामूळे चालक-वाहकांना प्रशासनाकडून सक्तीने रजा दिली जात आहे. आर्थिक नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ आणि गाड्यांच्या फेर्‍यांसाठी ड्युटी द्यावी या मागणीसाठी वाहक आणि चालकांनी डेपो क्रमांक एकमध्ये बसगाड्या रोखून धरण्याचे आंदोलन केले. त्यामूळे आगारातून गाड्या बाहेर पडल्या नाहीत.

डेपोत येणार्‍या गाड्या आणि जाणार्‍या गाड्या रोखून धरल्याने आतमधील गाड्यां मार्गस्थ होताना वेळापत्रक कोलमडून पडले तर बाहेरून येणार्‍या गाड्यांना दुरुस्ती देखभालसाठी रखडून रहावे लागले.

डेपो क्रमांक एकच्या प्रवेशद्वारावरच वाहक आणि चालकांनी आंदोलन केले. त्यामूळे दूपारी बराचवेळ वाहक-चालकांची समजूत काढण्यासाठी विभागीय वाहतूक नियंत्रकांची धावपळ सुरु होती.

LEAVE A REPLY

*