दाभाडी, सौंदाणे ग्रामपंचायतीत भाजपाचा सरपंच; राज्यमंत्री दादा भुसेंना हादरा

0

मालेगाव, ता. ९ : प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दाभाडी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाने सरपंचपदासह ११ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. तर शिवसेनेचे ६ सदस्य निवडून आले आहेत.

चारुशीला निकम या दाभाडीच्या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. तर सौंदाणे येथील सरपंचपदी डॉ मिलिंद पवार विजयी झाले आहेत.

राज्यमंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसे यांचे हे मूळ गाव असल्याने येथील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. या निर्णयानंतर राज्यमंत्री भुसे यांना हादरा बसला असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान तालुक्यातील वजीरखेडे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत कमळ फुलले असून. सरपंचपदासह १० जागांवर भाजपाचे सदस्य निवडून आले आहेत. तर शिवसेनेला एको जागेवर समाधान मानावे लागले आहे.

जातपाडे येथेही भाजपाचे सदस्य सरपंचपदी निवडून आले आहेत.

LEAVE A REPLY

*