सुलतान, मानसी आणि सुशील! आम्हाला तुमचा अभिमान वाटतो

सुवर्णपदकवीर सुलतान, मानसीसोबतच, रक्तदात्या सुशीलवर सदिच्छांना वर्षांव

0

नाशिक, ता. १६ :  वैद्यकीयच्या एमबीबीएस अभ्यासक्रमात सर्वाधिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या नाशिकच्या सुलतान आणि मानसीच्या यांच्यासोबतच अति दुर्मीळ असा बाँम्बे रक्तगट असलेल्या आणि महिलेचे प्राण वाचविणाऱ्या सुशील आरोटे याच्यावर शेकडो नाशिकरांनी अभिनंदन आणि सदिच्छांचा वर्षाव केला आहे.

बुधवारी देशदूत डिजिटलने सर्वप्रथम दोन्ही वृत्त प्रसिद्‌ध केल्यानंतर ते फेसबुक, ट्विटर अशा विविध सोशल मीडियावर प्रसारित होताच सुमारे २५ हजारावर नाशिककरांनी या दोघांचे कौतुक केले.

एवढी सारी पदके नाशिककरांनी मिळविली? तुमचे मन:पूर्वक अभिनंदन अशा शुभेच्छा सुलतान आणि मानसी यांना नाशिककर देत आहेत. तर खूप छान सुशील, आम्हाला तुझा अभिमान वाटतो या भाषेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिघांनाही शेकडो लाईक्स मिळाल्या आहेत.

LEAVE A REPLY

*