अलंगुण आश्रमशाळेतील विद्यार्थीनींच्या खोखो संघाची राज्यपातळीवर निवड

0

मनखेड (वार्ताहर) ता. १४ : सुरगाणा तालुक्यातील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण संचलित  अनुदानित आश्रम शाळा भेगू(सा.) येथील 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या खो-खो संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

नाशिक येथे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर विभागीय पातळीवरील या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यात भेगूच्या संघाने चुरशीच्या लढाईत जळगावचा पराभव केला.

या संघाला मुख्याध्यापक चौधरी,  श्री. वाडू, राठोड, वाडेकर यांच मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*