पोलिस आयुक्तालय तक्रार निवारण दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. ७ : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. यावेळी विविध पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आंपल्या विभागातील तक्रारदारांच्या तक्रारी सोडविण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले.

स्वत: पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनीही नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कारवाईचे आदेश  दिले.

पोलिस आणि जनतेमध्ये समन्वय साधला जावा, लोकांनी तक्रारींसाठी न घाबरता जास्तीतजास्त पुढे यावे यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

LEAVE A REPLY

*