सॅमसंगचे दोन ‘दमदार’ फोन

0

सॅमसंग कंपनीने दावा केला आहे की, दोन्ही फोन्स हे बजेट फोन्सच्या रेंजमधील आहेत. हे दोन्ही फोन्स अमेरिकेतील ठराविक रिटेल आणि कॅरियर पार्टनर्सतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दोन्ही फोन्समध्ये दमदार फिचर्स आहेत.

अँड्रॉईडवर चालणार्‍या सॅमसंग गॅलेक्सी ग3 (2018) फोनमध्ये 720 X 1280 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5 इंचाचा एचडी डिस्प्ले फोनला देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 8 चझचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फीप्रेमींसाठी 5 PX चा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी J7 (2018) या फोनमध्ये 20X1280 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. 13Px चा रियर आणि 13 Px चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये जास्त पावरफूल बॅटरी देण्यात आल्याचे लॉन्चिंगवेळी सांगण्यात आले. सॅमसंग गॅलेक्सी J3 (2018) आणि गॅलेक्सी J7 (2018) फोनमध्ये Samsung Knox इंटिग्रेट असेल. फोनमध्ये रियल टाईम कस्टमर केअर सपोर्टसाठी सॅमसंग+ अ‍ॅप देण्यात आला आहे. यासोबतच लाईव्ह वॉईस चॅट, कम्युनिटी सपोर्ट आणि टिप्ससारखे इतरही फिचर्सचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*