एनडीसीसी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडेंचा तडकाफडकी राजीनामा

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. २८ : नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

जिल्हा उपनिबंधकांकडे त्यांनी हा राजीनामा आज सायंकाळी सादर केला.

गेल्या काही दिवसांपासून आर्थिक कारणास्तव जिल्हा बँकेची अवस्था खराब झाली होती. नोटबंदीनंतर तर बँकेची अवस्था अतिशय बिकट झाली होती.

शेतकऱ्यांच्या पीककर्जापासून ते शिक्षकांचे पगार रखडण्यापर्यंत परिस्थिती या बँकेवर ओढवली होती. वसुलीपेक्षा थकबाकी जास्त झाल्याने बँकेची आर्थिक कोंडी झाली होती.

शिवसेनेचे दिग्गज मंत्री असतानाही सत्ताधारी सेनेच्या ताब्यातील या बँकेची अडचणी पक्षाला सोडविता आल्या नव्हत्या.

या सर्व परिस्थितीतून बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाची दिवसेंदिवस कोंडी होत होती. बँकच्या स्थितीवर मार्ग काढण्यासाठी मध्यंतरी अध्यक्ष दराडे यांनी मुख्यमंत्र्यांनाही साकडे घातले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही.

एकूण बिघडत चाललेल्या स्थितीमुळे श्री. दराडे यांनी राजीनामा दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा आहे.

पुढच्या वर्षी जयंत जाधव यांचा  विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेचे पारडे जड आहे म्हणून दराडे यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

*