नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार क्रिकेट कोच ?

0
मुंबई- कबीर खान लवकरच 1983 साली भारतीय संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा प्रवास पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे हे आधीच जाहीर झाले आहे. आता या आगामी चित्रपटातील अन्य स्टारकास्टची नावेही समोर येत आहे. या चित्रपटासाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी संपर्क करण्यात आल्याचे कळतेय.

नवाजुद्दीनने हा प्रस्ताव स्वीकारल्यास तो या चित्रपटात भारतीय क्रिकेट टीमच्या तत्कालीन प्रशिक्षकाची भूमिका वठवताना दिसेल. नवाजुद्दीनने आधीही कबीर खानसोबत काम केले आहे. कबीर खान दिग्दर्शित बजरंगी भाईजान या चित्रपटात नवाजने पत्रकाराशी भूमिका साकारली होती. कपिल देव यांनी 1983 साली भारताला क्रिकेटमध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. कपिल देव या संघाचे कर्णधार होते.

त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला धूळ चालत विश्वचषकावर नाव कोरले होते. या चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. ऑगस्ट 2019 मध्ये हा चित्रपट रिलीज होईल, असेही मानले जात आहे. अद्याप कबीर खान यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही.

LEAVE A REPLY

*