ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे “राष्ट्रीय सेवारत्न”पुरस्काराने सन्मानित

0

नाशिक (प्रतिनिधी) : भावना बहुउद्देशीय संस्था आणि जमाते इस्लामी हिंद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांना त्यांच्या ज्योतिषविषयक कार्यासाठी राष्ट्रीय सेवारत्न अवार्ड देऊन गौरविण्यात आले.

आ.बाळासाहेब सानप आणि ब्रह्मा व्हॅलीचे डॉ बापूसाहेब देसाई यांनी मानपत्र दिले. पंचवटीत निर्मल मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

हा पुरस्कार म्हणजे नाशिक शहरातील पूर्वापार चालत आलेल्या अध्यात्मिक आणि ज्योतिष परंपरेचा आणि आपण केलेल्या सेवाकार्याचा गौरव असल्याची भावना यावेळी श्री धारणे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार, नगरसेवक मच्छिंद्र सानप , नगरसेवक गणेश गीते,नगरसेविका पूनम धनगर उपस्थित होते. आयोजक महेश मुळे, हैदरभाई शेख, अब्दुल्ला कादरी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*