खर्चाला फाटा देऊन साखरपुड्यातच उरकला लग्नसमारंभ

0

खेडगाव (वार्ताहर) ता. १ :  सोनजांब येथे साखरपुड्यातच विवाह आवरुन अनावश्यक खर्चाला फाटा दिला आहे.

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील प्रगतशील शेतकरी आंबादास भास्करराव जाधव यांची कन्या गायत्री व दिंडोरी येथील अरुण धोंडीराम बोरस्ते यांचे चिरंजीव अमोल याचा साखरपुडा कार्यक्रम सोनजांब येथे  आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार रामदास चारोस्कर,  दिंडोरी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, मंगेश देशमुख, समाधान जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वधू -वरांना विचार आवडले व उपस्थित नातेवाईक यांनीही  साखरपुडा कार्यक्रमात लग्नास मान्यता देऊन एकाच दिवशी सर्व कार्यक्रम संपन्न झाला.  या अनोख्या विवाहसोहळ्यामुळे नववधु-वराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याप्रसंगी वधूचे मामा सुनिल उगले, वरांचे मामा भाऊसाहेब ढगे, माजी सरपंच तुकाराम जाधव, संजय जाधव, केवल अहिरे, यशवंत जाधव आदींसह पदाधिकारी, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*