मनमाडमध्ये ईद-ए-मिलादनिमित्त सदभावना जुलूस

0

मनमाड (प्रतिनिधी) ता. २ : जगाला शांती,सदभावना व बंधुभावाचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरमोहम्मद पैंगबर(सं.अ.)यांचा जन्मदिवस अर्थात ईद- ए-मिलादुन्नबी मनमाड शहरात आज (शनिवार) पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्त शरबत, हलवा,पेढे वाटपासोबत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून भव्य जुलुस काढण्यात आला होता त्यात हजारो मुस्लिम बांधवा सोबत इतर धर्मीय नागरिक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे पैगंबर जयंतीत राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्म समभाव दिसून आले.

जामा मस्जिदचे मौलाना असलम रिजवी साहब, कसाई मोहल्ला मस्जिदचे मौलाना हाजी शब्बीर अहेमद साहब यांच्या नेतृत्वाखाली सकाळी भव्य जुलूस काढण्यात आला.

कॉंग्रेस भवनाजवळ जुलूस आल्यानंतर येथे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हाजी अफजल शेख, नगरसेवक संतोष आहिरे, रवींद्र घोडेस्वार, सुभाष नहार,अशोक व्यवहारे,भीमराव जेजुरे,बाळासाहेब साळुंके यांनी प्रमुख मौलानाचा सत्कार केला.

त्यानंतर शहरातील विविध मार्गावरून जाऊन हा जुलूस पालिकेजवळ आल्यानंतर नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, यांनी शहराच्या वतीने जुलूसचे जोरदार स्वागत करून मौलानाचा सत्कार केला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर,सर्व नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होते.

त्यानंतर डॉ आंबेडकर पुतळ्या जवळ आरपीआय आणि शिवसेनेतर्फे राजेंद्र आहिरे, गंगाभाऊ त्रिभुवन, गणेश धात्रक, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते सर्व प्रमुख मौलानाचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक कैलास गवळी,दिलीप भाबड,प्रमोद पाचोरकर,लियाकत शेख यांच्यासह अल्ताफ खान,अड.सुधाकर मोरे,बापू वाघ,संजय कटारिया,सुनील हांडगे,रवी खैरनार,यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

गायकवाड चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी जुलूसचे स्वागत करून मौलानाचा सत्कार केला.

त्यानंतर जुलूसची सांगता जामा मस्जिद जवळ झाली येथे जगात व देशात शांतता नांदावी,भारतात सर्व जाती धर्मांच्या लोकामध्ये सलोख्याचे कायम संबंध रहावे. सर्व क्षेत्रात देशाची भरभराट व्हावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

इस्लाम धर्माच्या कैलेंडर नुसार मोहम्मद पैगंबर यांचा जन्म हा १२ रब्बिउल अव्वल या महिन्यात झाला असून हा दिवस जगभरातील मुस्लीम बांधव ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून साजरा करतात. विशेष म्हणजे वयाच्या ६३ व्या वर्षी मोहम्मद पैगंबरानी याच दिवशी जगाचा निरोप घेतला आहे त्यामुळे या दिवसाला इस्लाम धर्मात एक आगळेवेगळे महत्व आहे.

पाकिजा कॉर्नर,उस्मानिया चौक,एकात्मता चौक,रेल्वे स्टेशन गेट,गायकवाड चौक,जमधाडे चौक,इदगाह चौक,हुसेनी चौक यासह इतर ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुप तर्फे पाणी,शरबत,मिठाई,चॉकलेट,खजूर वाटप करण्यात आले तर काही ठिकाणी आकर्षक देखावे उभारण्यात आले होते. जुलूस मध्ये प्रमुख मौलाना हे अश्वरूढ असायचे मात्र गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा मोडीत काढून यंदा प्रथमच सर्व मौलाना देखील समाज बांधवा सोबत जुलूस मध्ये पायी चालत होते.

LEAVE A REPLY

*